• # 1666: सुटली शाळा . कथन : (प्रा.सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 31 2025

    Send us a text

    खरंच किती सोप्पं होतं आयुष्य तेव्हा...
    जसं जसं वय वाढू लागलं तसं तसं गणिताची आकडेमोड हातापायांच्या बोटांत मावेनाशी झाली.
    इतिहासातली सनावळ ही भुतावळीसारखी मानेवर बसली होती...
    पण आज जेव्हा शाळेचा हात सुटला तेव्हा माझ्या सोबत माझे जिवाभावाचे मित्र होते. माझा आत्मविश्वास होता,
    डोळ्यात उद्याची स्वप्ने होती,
    कुठल्याही परिस्थितीत मला सावरणारी संस्काराची शिदोरी होती...
    आणि मनांत कधीही न पुसल्या जाणाऱ्या आठवणी होत्या...

    Show More Show Less
    7 mins
  • # 1665: लोखंडी कपाट. लेखन : नीता चं कुलकर्णी. कथन (: प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 30 2025

    Send us a text

    पन्नास पंचावन्न वर्षांपूर्वी एकंदरीत सर्वच समाज साधा मध्यमवर्गीय असा होता.
    घरं बैठी साधी लहान लहान दोन- तीन खोल्यांची असायची.
    घरातलं सगळ्यांत मुख्य एकमेव फर्निचर म्हणजे...
    "लोखंडी कॉट" असायची.
    ईतके जणं असुनही घरात एकचं लोखंडी कपाट असायचे.
    ज्याला सगळेच " गोदरेजचे कपाट "म्हणतं असत......

    Show More Show Less
    6 mins
  • # 1663: British Empire medal विजेते उदय भोसले यांची मुलाखत : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 31 2025

    Send us a text

    योगामुळे जागतिक सन्मान: उदय भोसले यांची कहाणी

    योगाचार्य डॉक्टर अय्यंगार गुरुजींचे शिष्य उदय भोसले यांनी कोविड काळात योगाच्या प्रसाराद्वारे जगभरातील हजारो लोकांना आरोग्य आणि मानसिक शांतता प्रदान केली. ऑनलाईन वर्ग आणि उपचार पद्धतींनी त्यांनी अनेकांचे जीवन सुखकर केले.

    या कार्याचा गौरव म्हणून Her Majesty Queen Elizabeth’s Honour List मधून त्यांना British Empire Medal (B.E.M.) प्रदान करण्यात आला.

    "योग ही केवळ व्यायामाची पद्धत नसून, शरीर-मन-आत्मा यांना जोडणारी जीवनशैली आहे," असे उदय भोसले म्हणतात. त्यांच्या या योगदानामुळे भारतीय योगविद्या जागतिक स्तरावर अधिक उंचावली आहे.

    उदय सरांची ही मुलाखत.

    Show More Show Less
    10 mins
  • # 1664: जर्मनीतील वंशसंहार ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jan 30 2025

    Send us a text

    युद्धकाळात जर्मनी व पोलंड या देशांत ‘श्रमछावणी’ या गोंडस नावाखाली छळछावण्या सुरू झाल्या. हिटलरचा निकटवर्ती हायरिश हिमलर याच्या आदेशानुसार ऑस्वीसिममध्ये सुरू झालेला अॅाशविट्ज हा सगळ्यांत कुख्यात ‘कॉन्सन्ट्रेशन कॅम्प’ म्हणजे छळछावणी. सन १९४०पासून येथे रोज हजारो अभागी लोक रेल्वेत कोंबून आणले जात असत. त्यांना निकृष्ट अन्नपाणी देऊन कामाला जुंपण्यात येई. ही तरुण मुलं अफाट कष्टांमुळे आणि अन्नपाण्याअभावी मरून जात. बायकामुलांची रवानगी सरळ गॅस चेंबरमध्ये होई.

    Show More Show Less
    10 mins
  • # 1662: ‘आज्जी‘ कथन (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 24 2025

    Send us a text

    एकदा मी सगळ्यांच्या अगोदर जेवलो. मग रात्री आज्जीने मला जवळ घेतलं. म्हणाली,
    "हे बघ सगळयांनी पंगतीनं असावं. एकोप्यानं जेवावं. पंगतीतल्या शेवटच्या माणसाच्या ताटात अन्न पडत नाही, तोपर्यंत तोंडात घास घालू नये "...
    मागे मामांनी वांगी आणली होती.
    तिने मला विचारलं "पिशवीतनं काय परत दिलंस ?"
    "काही नाही" मी नाही म्हणलो.
    आज्जी म्हणाली,
    "आपली संस्कृती माघारी देण्याची आहे. नुसतं घेण्याची नाही."

    Show More Show Less
    6 mins
  • # 1661: "या हनुमंतजी, स्थानापन्न व्हा..!" ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )
    Jan 23 2025

    Send us a text

    त्याला वाटलं की हे महाराज रोज "या हनुमानजी स्थानापन्न व्हा" असं म्हणतात खरं पण काय खरंच हनुमानजी येत असतील ! हा असा विचार करता करता या वकिलाने त्या संताला शेवटी विचारलंच, "महाराज, तुम्ही रामायण खूप सुंदर सांगता. तुमच्या प्रवचनामुळे मनाला खूप आनंद मिळतो पण तुम्ही दररोज एक आसन हनुमानजींसाठी ठेवता आणि त्यावर त्यांना बसायला सांगता. मला एक सांगा, त्यावर खरंच हनुमानजी येऊन बसतात का ?"
    यावर ते साधुमहाराज म्हणाले, "नक्कीच. मला पूर्ण खात्री आहे की रामकथा सुरू आहे म्हणजे हनुमानजी इथे नक्कीच येत असणार".

    Show More Show Less
    8 mins
  • # 1660: संक्रांतीचा हलवा. लेखिका सुजाता लेले. कथन ( मीनल भडसावळे )
    Jan 22 2025

    Send us a text

    छोटे छोटे समारंभ आपण करत असतो. त्याप्रमाणे एक तिळगूळ कार्यक्रम असतो. आई मुलीबरोबर बाकी घरातल्या महिलांबरोबर तयारी करते. छोट्या मुलीच्या मनात मैत्रिणीबद्दल द्वेष असतो. त्याचे परिवर्तन हलवा म्हणुन खडे -मीठ देण्यात होते. त्यानंतर सर्वांनी मिळून त्या मुलीला जी शिकवणूक दिली त्याची ही गोष्ट आहे. आजकालच्या स्पर्धेच्या युगात लहानपणापासून ही शिकवण आवश्यक आहे.

    Show More Show Less
    4 mins
  • 1659: "Outsourcing हा रोग आहे." लेखक डॉ. उदय निरगुडकर. कथन : (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Jan 21 2025

    Send us a text

    धोका हा की ही outsourcing ही मानसिकता कुटुंबात पण आली आहे.
    पोळ्या बनवणे ,गाडी चालविणे आम्ही outsource करतो. ठिक आहे.
    पण मुलाला संस्कार करण्यासाठी आम्ही व्यक्तिमत्त्व विकास शिबिरात पाठवतो
    म्हणजे आमची जबाबदारी संपली.
    एकदा मत दिले की पुढील पाच वर्षे राष्ट्र मोठे करायची जबाबदारी
    आम्ही राज्यकर्त्यांवर outsource करतो.
    देश सशक्त म्हणजे नागरीक सशक्त...

    Show More Show Less
    9 mins